आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने पेट्रोलचे दर प्रती लिटर 79 रुपये आणि डिझेलचे दर प्रती लिटर 65 रुपयांवर पोहोचले आहेत. दररोज बदलणाऱ्या किंमतींनुसार,राजधानी दिल्लीत डिझेलचे दर 61.74 रुपये प्रती लिटर, तर पेट्रोलचे दर 71 रुपये प्रती लिटर आहेत. मात्र मुंबईत पेट्रोलचे दर 79.06 रुपये प्रती लिटर, तर डिझेलचे दर 65.74 रुपये प्रती लिटर आहेत. राजधानी दिल्लीतील ही ऑगस्ट 2014 नंतरची सर्वात उच्चांकी किंमत आहे.पेट्रोलच्या किंमतीत 2 रुपयांनी अचानक वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर भडकले आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने एक्साईज ड्युटीत कपात करावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews